सत्ताधाऱ्यांची गुर्मी आणि ढोबळ आत्मविश्वास
- vkshsoc
- Sep 22, 2018
- 1 min read
आपल्या संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी सन २०१६ साली एक विक्रीकरारनामा केला. जिथे जवळपास आपल्या संस्थेची २६७४५ चौ. मी. जागा (६१% जागा) व्यावसायिकास विकली आणि मोबदल्यात आपला स्वार्थ साधून घेतला. *थोडक्यात सांगायचे म्हणजे जितका पैसा त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी लावला त्याच्या १०० पटीने वसूल केला.*
आपल्या संस्थेस याच्याबद्दल काय मिळाले, तर याचे उत्तर काहीच नाही. मग हा विक्रीकरारनामा का केला गेला. तर ठराविक लोकांचा भरमसाठ फायदा.
या लोकांना तर असे वाटत होते की आम्ही या संस्थेचे मालकच आमच्याविरूद्ध कोणाचा आवाज तर सोडाच तर कोणाची मान वर करायची हिम्मतसुद्धा होणार नाही. जणूकाही अंधाराचे साम्राज्य संस्थेवर पसरले होते (जे अजूनहि थोड्याफार प्रमाणात आहे). या अंधाराचा नायनाट करण्यासाठी एका ठिणगीची गरज होती. ती ०३ आॅगस्ट २०१८ च्या संध्याकाळी पडली होती. मग काय तिचा वणवा होण्यास वेळ लागला नाही. हा वणवा ०८ सप्टेंबर २०१८ च्या दुपारी पूर्ण गावांत पसरला. ज्याची झळ सर्व भ्रष्ट पदाधिकाऱ्यांना बसली आहे. म्हणून ते आता सैरभैर झाले आहेत आणि काही तर बिळात जऊन बसलेत. इथे मी एक सांगू इच्छितो की हे पदाधिकारी एका-दोघा सभासदांना वेठीस धरू शकतात. पण पूर्ण समाजास नाही.
आता विजय फक्त आपला आणि आपलाच आहे. ज्याचा श्री गणेशा झाला आहे.
Comments