आपली संस्था आणि सोन्याची अंडी देणारी कोंबडी
- vkshsoc
- Sep 22, 2018
- 1 min read
सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडीची गोष्ट तर सर्वश्रुतच आहे. तरी थोडे सक्षिप्त विश्लेषण.
एका शेतकऱ्यावर प्रसन्न होऊन त्याला एक कोंबडी दिली. जी रोज एक सोन्याचे अंडे देत असे. ज्यामुळे त्याचा बऱ्यापैकी उदरनिर्वाह चालत असे. पण त्याला हाव सुटली आणि त्याने सर्व अंडी एकदाच मिळविण्याच्या नादात कोंबडी कापली. नंतर पश्चाताप करू लागला.
तसेच आपल्या संस्थेचे आहे. आपल्या पूर्वजांनी एक संस्था स्थापन केली. ह्या संस्थेमुळे बहुतेकांचा व्यवसाय चालत असे.
पण काही लोकांच्या अतिहव्यासापायी त्यांनी हि सोनयाचे अंडे देणारी कोंबडी दिडदमडीच्या व्यावसायिकास विकली.
ज्याचा पश्चाताप ( सर्व सभासदास ) होत आहे.
संस्थेच्या विक्रीकरारनाम्यानुसार ६१% जागा व्यावसायिकास दिली आहे.
एकूण ६१% म्हणजेच २६७४५ चौ. मी. = २८७८८० चौ.फूट
ज्याची आजची किंमत रू. ३०,०००/- प्रति चौ. फूट प्रमाणे रू ८६३,६४,००,०००/- (आठशे त्रेषष्ठ कोटी चौषष्ठ लाख रूपये) क़मीत कमी आहे.
आणि महत्वाचे म्हणजे, ही ज़मीन शासनमान्य आहे. जी पूर्वजांनी आपल्या भविष्यातरीता ठेवलेली आहे.
Comentários