आपली सहकारी संस्था आणि त्यात रुतलेले काटे
- vkshsoc
- Sep 22, 2018
- 1 min read
कोणालाही हिरवळीतून चालायला आवडते.
पण प्रत्येकवेळी तुमच्या वाटेत फुलेच असतील असे नाही. जोपर्यंत तुम्हाला काट्यांची प्रचिती येत नाही. तोपर्यंत तुम्ही सक्षम होत नाही.
एवढंच कशाला आपण कोळी आपला मुख्य व्यवसाय हा मासेमारी मग आपला संबंध काट्यांशी येणारच. मग जसा मासा तसा त्याच्या काट्याचा प्रकार.
पण जेव्हा हा काटा पायांत रूततो, तेव्हा तर चालणे खूपच कठिण. कधी एकदा हा कांटा पायातून निघतो हा सतत विचार आपल्यास सतावत असतो. कारण ह्या वेदना आपण खूप काळ सहन करू शकत नाही. एकदा का काटा पायातून निघाला की आपल्याला खूप बरे वाटते.
तसेच आपल्या संस्थेचे आहे. आपल्या संस्थेत बरेच असे काटे रुतलेले आहेत. जे वेळच्या वेळी काढणे गरजेचे आहे नाहीतर हे कांटे आपली संस्था पोखरतील आणि दूषित करतील.
आता तर आपली संस्था या बिल्डरच्या घशातून काढणे आत्यंतिक गरजेचे आहे.
Comments