आणि वाल्या कोळीचा झाला महर्षी वाल्मिकी
- vkshsoc
- Sep 22, 2018
- 1 min read
आपणां सर्वांना वाल्या कोल्याची गोष्ट माहितच आहे. तरी थोडे विश्लेषण ...
खूप खूप वर्षांपूर्वी (त्रेतायुगात - पुराणकाळानुसार) एका जंगलात एक क्रूर दरोडेखोर राहत असे. तो आणि त्याचे सहकारी जंगलातील वाटसरू आणि यात्रेकरूंना लूटत असत. अशाने तो स्वत:चा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असे.
अशाने सर्व प्रजा त्रस्त होती.
देवर्षी नारद यांनी त्याचे परिवर्तन करायचे ठरविले आणि त्यांनी जंगलाच्या दिशेने प्रवास सुरू केला. तेव्हा वाल्या कोळीने त्यांची वाट रोखली आणि संपत्तीची मागणी केली. देवर्षी नारद यांनी त्याला विचारले हे तू सर्व कोणासाठी करीत आहेस.
वाल्या कोळ्याने तत्परतेने उत्तर दिले. हे सर्व मी माझ्या कुटुंबाकरीता करत आहे. तेव्हा नारदांनी विचारले मग जा आणि त्यांना विचार की तू केलेल्या पापांत वाटेकरी आहेत की नाहित.
वाल्या कोळी आपल्या कुटुंबाबद्दल खूप आश्वस्त होता.
*वाल्या कोळीने आपल्या कुटुंबाला विचारले तेव्हा त्याच्या पत्नीने आणि मुलांनी त्याने केलेल्या पापांत वाटेकरी होण्यास स्पष्ट नकार दिला.*
तेव्हा त्याने तपश्चर्या करून महर्षी पद मिळविले आणि अजरामर रामायण रचिले.
पण आज परिस्थिती तीच आहे. पण युग बदललेले आहे. ज्या वाल्याचा वाल्मिकी झाला. त्याचा आदर्श पूर्ण विश्वाने घेतला.
पण आपला कोळी समाज या घडामोडीत खूपच मागे राहिलो.
*आज मला कळले आपल्या संस्थेचे पदधिकारी भ्रष्टाचारी आहेत. तर मग तो माझा (बाबा/आई/मुलगा/मुलगी/काका/काकी/ मामा/मामी/मावशी/आत्या/भाऊ/बहिण/मित्र) कोणीही असेल.*
*जर वाल्या कोळी (वाल्मिकी ऋषी) सारख्या महान व्यक्तीच्या च्या कुटुंबाने त्याच्या पापात सहभागी होण्यास नकार दिला, तर मग आम्ही का या पदाधिकाऱी (तर मग तो माझा बाबा/आई/मुलगा/मुलगी/काका/काकी/ मामा/मामी/मावशी/आत्या/भाऊ/बहिण/मित्र यापैकी कोणीही असेल) याने केलेल्या पापाचे वाटेकरी होऊ. त्याच्या पापाचे परिणाम त्यानेच भोगले पाहिजे
Comentarios