स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क
- vkshsoc
- Aug 20, 2018
- 2 min read
आपल्या देश हा पारतंत्र्यात होता. सर्व काही साहेबांच्या(इंग्रज) मर्जीनुसारच व्हायचे. इंग्रजांचा व्यापार हा मुख्यत: समुद्रामार्गेच चालत असे. इंग्रजांना भारतातील सर्वात जवळचे सोयीस्कर बंदर हे मुंबईच. मुंबई ही पोरतुगीजांकडून इंग्रजांना बहाल करण्यात आली.
मग काय मुंबईचा कायापालट इंग्रजांनी सुरू केला. सात बेटांची मुंबई ही पसरू लागली. १८५३ साली देशातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे धावली.
सर्व काही प्रगती पथावर होते. पण खंत मात्र एकच ती म्हणजे पारतंत्र्याची. स्वःताचं म्हणावं असं काहीच नाही. ( खरे सांगायचे म्हणजे आम्हां कोळी लोकांसाठी दर्या हिच आमची दौलत ). त्यात श्री. दांडेकरांनी आपल्या वेसावे गावांत तरूणांची जमवाजमव सुरू केली. स्वातंत्र्यासाठी (स्वराज्यासाठी) काहीही करण्याची तयारी. मग काय हां हां म्हणताच बरीच मोठी फौज तयार झाली. प्रत्येकाने घरादाराची पर्वा न करता स्वत:ला स्वातंत्र्य संग्रामात झोकून दिले. त्यातील काही नावे अॅड. शांताराम वेसावकर, जनार्दन पाटील, रमेश रामले, नारायण पाटील, पांडुरंग रामले, गोवींद सिद्धे, हरीश्चंद्र घुस्ते, भालचंद्र तेरेकर, भालचंद्र भंडारी, गोपीनाथ कास्कर, रामचंद्र घारू...... (हे सर्वजण आपल्या संस्थेचे संस्थापक). तर देशाच्या स्वातंत्र्यात आपल्या गावाचेही मोलाचे योगदान आहे.
जेव्हा कधीही स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येतो. त्यावेळी वेसावे गावांत निघणारी प्रभात फेरी हे मुख्य आकर्षण. ज्याची सुरूवात आपल्याच गावांतील स्वातंत्र्यसैनिकांनी केली होती. ती परंपरा आजही सुरू आहे.
हि प्रभातफेरी वेसावे म्युनि. शाळा ते आपल्या संस्थेचे पटांगण. याचा उद्देश एकच समाजात देशाभिमान जागविणे. मग गावांतील प्रत्येक गल्लीचे सभासद, प्रत्येक संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित राहायचे. (विशेषत:खोजा आणि सुन्नी जमातही) साहजिक ध्वजारोहण हि सामाजिक प्रतिनिधीच करायचे.
आज आपली संस्था ही स्वार्थी लोकांच्या हाती गेली आहे....त्याचा फ़ायदा दिडदमडीच्या व्यावसायिकांना होत आहे. हाच का तो वेसावा कोळीवाडा जिथे शंभराहून अधिक स्वातंत्र्य सैनिक होते. कधी कधी हा प्रश्न भेडसावत राहतो. आपली पूर्वजांची मिळकत (आपली जागा) कवडीमोलाच्या भावात व्यावसायिकास विकली.
हा व्यावसायिक त्याचे काम फत्ते करून परागंदा होणार आणि आपल्याला त्याचे परिणाम भोगायला लागणार. जर आपण आज जर यांना हद्दपार नाही केले. तर उद्या आपल्यावर हद्दपार व्हायची वेळ येईल.
*एकजूट व्हा आणि संघर्ष करा.*
Comments