विष्णूगुप्त चाणक्य आणि आम्ही घेतलेली शपथ
- vkshsoc
- Sep 22, 2018
- 1 min read
काळ तसा खूपच जुना. जवळपास २३०० वर्षे पूर्वीचा.आजच्या एकसंध भारताचे श्रेय बहुतेक जाते ते विष्णूगुप्त यांना अर्थात चाणक्य यांना. त्याकाळी भारत देश हा त्यावेळी वेगवेगळ्या साम्राज्यात विभागलेला होता. या विभागलेल्या साम्राज्यात एकमेव बलशाली राज्य होते *मगध साम्राज्य* राजा घनानंदचे राज्य (आजचा बिहार, उत्तर प्रदेश आणि बंगालचा प्रांत) त्यातला हा प्रख्यात पंडित चाणक्य.
सर्व काही आलबेल चालले होते. त्यात एक अशी घटना घडली ज्याने सर्व भारताचा इतिहास बदलला. अलेक्झांडरचे भारतावरील आक्रमण. चाणक्यने धनानंदास त्या आक्रमणास प्रत्युत्तर देण्याचे ठरविले. पण विलासी आणि रंगरेल राजास त्याची पर्वा कुठे. चाणक्यास भरसभेत अपमानित व्हावे लागले. मग चाणक्याने शपथ घेतली.
*जोपर्यंत या नंदकुळाचा नाश करणार नाही, तोपर्यंत मी माझ्या शेंडीला गाठ मारणार नाही.*
आज आपल्या संस्थेत आणि वेसावे गावांत तशीच काही परिस्थिती उद्भवली आहे. आपल्या स्वार्थासाठी आणि विलासीपणासाठी भ्रष्ट पदाधिकाऱांनी बिल्डरला संस्थेची जागा विकली आहे. तसेच *जोपर्यंत हे भ्रष्ट पदाधिकारी आपल्या संस्थेतून पायउतार होत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही*.
Comments