व्यथा कोळी समाजाची* वेसावकरांचे प्रलंबित प्रश्न
- vkshsoc
- Aug 20, 2018
- 2 min read
आपल्या भारतात अनेक महापुरुष संत ऋषी झाले. उदा.वाल्मिकी व व्यास मुन्नी सारख्या महाऋषीनी रामायण व महाभारत असे वंदनीय ग्रंथ लिहिले. या वंश्याचे सबंधित अंगिकार कलागुण संपन्न असा आपला कोळीसमाज मी नरेश कालथे या समाजाचा एक घटक आहे. कोळी संस्कृती हि अति प्राचीन कोळीजमात मुंबईचा मुळ नागरीक आहे. कालांतराने आधुनिक जगाचा द्रुष्टीकोण पहाता कुटुंबात व समाजात वाढ झाली.
परंतु गावचे क्षेत्रफ वाढ किंवा नागरी सुविधा किंवा व्यवसायिक सहाय्य व ज्वलंत प्रश्नांपासुन आपण वंचितच राहिलो. याचा वेध घेता आपल्या लक्षात येईल कि आपल्या समाजाची एकजुट संघटना किंवा एकत्रित पणा किंवा एकसूत्री कार्यक्रम घेणे ह्या पासुन आपण अतिशय दुरवर राहिलो. म्हणूनच अनेक राजकीय संघटना किंवा राजकारणी लोकांनी आपल्या युवापिडीचा भरपुर फायदा करून घेतला आहे. अनेक जाती धर्माचे लोक आपल्या सोईनिशि आपल्या मागण्या माण्य करण्या साठि अंदोलने वेळ पडल्यास रस्त्यावर उतरुन त्याचा लाभ घेतात. आपला युवा वर्ग शेल्पिच्या आहारी व कोळी व्यवसायात कीती फायदा होतो हे सांगण्यात रंगत जातो समाजात वर्चस्व सिद्ध करण्यासाठि पैशाच्या आहारी जावून ते आपल्या मायभूमीचे वस्त्र हरण करायला सुध्दा मागेपुढे पहात नाही. कोळी व्यवसायात जास्त फायदा झाला की सर्व माध्यमातून त्याचा आवापोवा केला जातो. पण जेव्हा कर्ज काढून व्यवसायाला सुरुवात, बोटीला रंगरंगोटी व त्याला इतर खर्चा बरोबर पंन्नास ते साठ हजार रूपये डिसेल असा लाखो रुपये खर्च करून मासेमारी साठि गेलेली नैका जेव्हा रिकाम्या हातानी घरी परत येतो. तेव्हा त्या नाखवावर येणाऱ्या आर्थिक संकटाचा पारा वाचण्यासाठी आपण, राजकीय किंवा प्रशासकीय अधिकारी वर्ग बोलावून आपण त्या निराधार नाखवाचे आर्थिक सात्त्वन करतो काय ? तेव्हा कोळीसमाजा दुष्काळ जाहीर करण्यासाठी तुमच्या राजकीय पादुका झिजतात काय ?
इतर समाज सुधाकर व राजकारणी आपल्या जमिनी व बंदर किणारे हडप करण्याच्या मनस्तिथित चांगलेच दावपेच खेलत आहेत.
आता तरी आपण कोळी संस्कृती व कोळी परंपरा व मालमत्ता रक्षण हे आपले प्रथम कार्य समजून सर्व परी ज्ञात असणाऱ्या लोकांना एक मंच्यावर आणून जनजागृती करून मतभेद विसरून राजकीय पादुका बाहेर काढून राजकीय वापर समाजाच्या हितासाठी करून घेता आला पाहिजे. शाब्दिक चकमक बंद करा जे वक्तव्य करणार ते समाजाच्या हिताचे असले पाहिजे हा भान प्रत्येकाने ठेवला पाहिजे.
नरेश गजानन कालथे.
Comments