गेंड्याची कातडी आणि तत्वनिष्ठ ध्येय
- vkshsoc
- Aug 20, 2018
- 1 min read
दि. ०२ आॅगस्ट २०१८ रोजीची ती संध्याकाळ आजही स्मरणात आहे. जिथे आपल्या महिला सभासदांनी क्रांति मोर्चा द्वारे साऱ्या जगाला नारी शक्तिची ताकद दाखविली.
आपल्या वेसावा गावाच्या इतिहासात अशी घटना पहिलांदाच असावी.
या घटनेला जवळपास तीन आठवडे होत आले आहेत. या कालावधीत आपण आपल्या कार्यकारी मंडळास सर्वतोपरी समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काहीएक परिणाम नाही.
कारण कार्यकारी मंडळ आणि विकासक यांचे ठाम मत आहे. या क्रांतीची धार थोड्या कालावधीत बोथट होत जाणार आणि हे लोक सर्व काही विसरणार.
ह्या गेंड्याची कातडी असलेल्या लोकांना आमची ताकद दाखवून देऊ. आमची ही लढाई विक्रीकरारनामा रद्द झाल्याशिवाय शमणार नाही. कारण ही संस्था आणि त्याची मिळकत ह्यावर या मुठभर लोकांचा अजिबात हक्क नाही.
जय मल्हार....
Comments