आपली संस्था आणि महाभारत
- vkshsoc
- Aug 20, 2018
- 1 min read
आपल्ली संस्था ही भ्रष्टाचाराने पोखरली गेली आहे. त्याचा फायदा काही दिडदमडीच्या व्यावसायिकांना होत आहे.
आपल्या संस्थेतील प्रत्येक कार्यकर्ता हा बहुतेक सभासदांचा नातेवाईक असतो. मग त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराविषयी बोलणार कसे आणि कोण बोलणार?
आता मात्र आपल्या जमिनीचा प्रश्न आपल्या पुढच्या पिढीशी निगडित आहे. एकदा का ही जमिन व्यावसायिकाच्या हातात (घशात) गेली की ती परत मिळणे नाही. मग आपली पुढची पिढी आपल्याला दुषणे देत राहणार.
आता ही लढाई सत्य आणि असत्या मध्ये आहे.जशी महाभारतात झाली होती. त्या लढाईतही सर्वजण नातीगोती विसरून लढले होते. तिथे कुणाचा भाऊ, कुणाचा काका, कुणाचा मामा होता....पण गट मात्र दोन होते, एक धर्म (सत्य) आणि दुसरा अधर्म (असत्य).....
तसेच आपली ही लढाई सत्याच्या बाजूने आहे. जिथे असत्याची हार निश्चित आहे.
जय मल्हार.......
Comments